नसरापूर (पुणे) येथे पुरातन मंदिरातील महादेवाच्या पिंडीची विटंबना !
|
नसरापूर (जिल्हा पुणे) – भोर तालुक्यातील खडकी नसरापूर येथे गावाबाहेर खासगी शेतातील जागेत रामेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. २० एप्रिल या दिवशी पुजारी बबन गोहाड हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजा-पाठ करण्यासाठी गेले असता हत्यारांच्या साहाय्याने मंदिराच्या गाभार्यातील पिंडीची (दगडी शाळीग्राम लिंगाची) तोडफोड झाल्याचे त्यांना दिसले. पिंडीजवळील गणपतीची मूर्तीही काढून ठेवली होती. गोहाड यांनी तात्काळ सरपंच सचिन रांजणे, पोलीस पाटील बांदल आदींना भ्रमणभाष करून हा प्रकार सांगितला. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तात्काळ राजगड ग्रामीण पोलिसांनी मंदिराकडे धाव घेतली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी भेट देऊन झालेल्या प्रकाराविषयी माहिती घेतली आहे. या प्रकरणी नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘कोणत्याही अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.