आर्.टी.ई.चे सर्व्हर ठप्प असल्याने प्रवेश खोळंबले !
पुणे – शिक्षणाचा अधिकार (‘आर्.टी.ई.’) अंतर्गत शासनाच्या वतीने प्रवेश अर्ज ऑनलाईन भरून घेतले जातात; मात्र आर्.टी.ई.चे सर्व्हर चालत नसल्याने, तसेच संकेतस्थळही संथगतीने चालत असल्याने प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल का ? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शहरातील १७२ शाळांमधील ३ सहस्र २२५ जागांसाठी ११ सहस्र २३५ अर्ज आले आहेत. निवड आणि प्रतीक्षा सूची प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. पालकांनी अलॉटमेंट पत्राची प्रत घेऊन कागदपत्रांची पडताळणी केंद्रावरच करावी. पालकांनी घाबरून जाऊ नये, असे महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकासहस्रो विद्यार्थी सर्व्हर हाताळत असतांना तो बंद पडण्याची शक्यता लक्षात घेता काय काळजी घ्यायला हवी, याचा विचार होत नाही का ? यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना झालेला मनस्ताप कसा भरून निघणार ? याला उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! |