सांगली येथील सनातन संस्थेच्या साधिका प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे यांची ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठा’च्या होमिओपॅथी अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड !
सांगली – जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘डॉ. जे.जे. मगदूम होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालया’च्या ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन अँड फिलॉसॉफी’ विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या होमिओपॅथी अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे या सनातन संस्थेच्या साधिका असून कोणताही अवघड विषय अत्यंत सोप्या शब्दांत करून मांडण्यात त्यांचा हातखंड आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या आवडत्या असलेल्या प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे यांची मंडळावर निवड झाल्याविषयी महाविद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षक, शिक्षतेकर कर्मचारी, सांगलीतील आधुनिक वैद्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे यांचा अल्प परिचय !
प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे या सांगलीतील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर अजित भरमगुडे यांच्या पत्नी असून त्या गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतात. त्या गेली ३२ वर्षे ‘डॉ. जे.जे. मगदूम होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालया’त कार्यरत आहेत. ‘येणार्या आपत्काळात सामान्य माणसाला जर कोणतेही वैद्यकीय साहाय्य उपलब्ध नसेल, तर कशा प्रकारे तो होमिओपॅथी औषधांचा उपयोग करून स्वत:वर उपचार करू शकतो ?’, या संदर्भातील ‘होमिओपॅथी आपत्कालीन ग्रंथ’ या ग्रंथांचे संकलन त्या करत आहेत.
होमिओपॅथी अभ्यास मंडळाचे मुख्यत्वे कार्य हे विविध महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, नवनवीन शैक्षणिक पद्धती शोधून त्या कृतीत आणणे, शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, यांसह अन्य गोष्टींसाठी त्या कार्यरत आहे.
साधना आणि गुरुकृपा यांमुळेच माझी निवड होऊ शकली ! – प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडेया संदर्भात प्रा. डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे म्हणाल्या, ‘‘माझी अशा प्रकारे निवड होईल, असे मला अपेक्षित नव्हते. या निवडीसाठी अनेक डॉक्टर वर्षानुवर्षे प्रयत्न करतात; मात्र आवेदन भरल्यानंतर केवळ २४ घंट्यांत सदस्यत्व मिळणे, हे मी करत असलेली गुरुकृपायोगानुसार साधना आणि गुरुकृपा यांमुळेच घडू शकले, असे मला वाटते. या संदर्भात मी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.’’ |