लंडनमधील संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असतांना ब्रिटनमधील भारतीय दूतावासाने यावर अनेक वर्षे आक्षेप का घेतला नाही ?
‘ब्रिटनमधील लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम’मध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वाघनखांच्या बाजूला असलेल्या माहितीफलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील कु. वनश्री समीर शेडगे या युवतीने यावर आक्षेप घेत तेथील व्यवस्थापकांना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करण्याची सूचना केली. यावर पालट करण्याची सिद्धता या संग्रहालयाच्या व्यवस्थापकांनी दर्शवली आहे. याविषयीची माहिती कु. वनश्री यांनी सामाजिक माध्यमांद्वारे दिली आहे.’ (१९.४.२०२३)