(म्हणे) ‘भारताशी युद्धाची शक्यता असल्याने पंजाबमधील निवडणूक पुढे ढकलावी !’-पाकिस्तान
पाकिस्तान सरकारची तेथील सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात तेथील सर्वोच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला आहे. देशातील राजकीय अस्थिरता, तसेच आतंकवादी घटना यांमध्ये झालेली वाढ आणि भारताशी थेट युद्धाची शक्यता, यांमुळे पंजाबमध्ये निवडणूक घेण्यात अडथळे येत असल्याचे त्यांनी या अहवालात म्हटले आहे. तसेच या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. या अहवालानंतर सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय खंडपिठाने ही निवडणूक १४ मे या दिवशी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
Pakistan’s defence ministry, in a report to the Supreme Court, says India’s spy agency R&AW plans to exploit fault lines of the country.
Is Pakistan using the claim as an excuse to delay the elections in Punjab province, fearing growing popularity of @ImranKhanPTI? pic.twitter.com/iLrDADmTSe
— WION (@WIONews) April 20, 2023
या अहवालात म्हटले आहे की, राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतात आता निवडणूक घेतली, तर जातीवाद, पाणीप्रश्न आणि इतर सूत्रे यां लाभ घेऊन भारत पाकिस्तानात अस्थिरता निर्माण करू शकतो. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोर पुन्हा एकदा नवे संकट निर्माण होईल.
संपादकीय भूमिकाभारताने जर पाकविरुद्ध युद्ध करून जिहादी आतंकवाद नष्ट केला, पाकव्याप्त काश्मीर मुक्त केले, तर भारतियांना आनंदच होईल; सरकार हे धाडस दाखवणार का ? |