(म्हणे) ‘रामनवमी, हनुमान जयंती हे उत्सव दंगलींसाठीच झाले आहेत”-जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान !
|
मुंबई – औरंगाबादला दंगल झाली. रामनवमी, हनुमान जयंती हे उत्सव दंगलींसाठीच झाले आहेत कि काय ?, असे वाटते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घाटकोपर येथे झालेल्या शिबिरात ते बोलत होते. या प्रकरणी भाजपच्या वतीने निदर्शने करत अंधेरी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
आव्हाड म्हणाले, ‘‘यंदाचे वर्ष धार्मिक दंगलीचे आहे; कारण हे (सरकार) नोकर्या देऊ शकत नाहीत. वस्तूंचे भाव न्यून करू शकत नाहीत. राजकीय अस्थिरता न्यून करू शकत नाहीत. राजकीय अवमूल्यन झाले आहे. सगळ्या बाजूंनी उतार लागला आहे. सर्वांत सोपे काय आहे, तर असे धार्मिक सोहळे करा. त्या सोहळ्यातून मते जमा करा. नाहीच जमले, तर आग लावून टाका.’’
Jitendra Awhad News : मुंबईतील कार्यक्रमातील वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यताhttps://t.co/HPrJGVxXz6#Sarkarnama #MarathiNews #controversial #JitendraAwhad #NCP #BJP #mumbai
— Sarkarnama (@SarkarnamaNews) April 22, 2023
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह यांची चेतावणी “आव्हाडांनी हिंदु धर्माचा अपमान चालू ठेवला, तर त्यांचे स्वागत चपलांनी करू !”मुंबई – भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह म्हणाले, ‘‘जितेंद्र आव्हाड हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. रामनवमी आणि हनुमान जयंतीची शोभायात्रा भारतात नाही काढणार, तर काय पाकिस्तानमध्ये काढणार का ? आव्हाडांना लवकरात लवकर अटक करावी. जर हिंदु धर्माच्या विरोधात त्यांनी सतत असा अपमान चालू ठेवला, तर ते जिथे दिसतील, तिथे आम्ही त्यांचे चपलांनी स्वागत करू.’’ |
संपादकीय भूमिकाअशी विधाने करून दंगली घडवणार्या धर्मांध मुसलमानांची पाठराखण करणार्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी ! |