पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट !
‘गांधर्व महाविद्यालया’चे निबंधक (रजिस्ट्रार) श्री. विश्वास जाधव आणि तबलावादक पं. अमोद दंडगे यांचीही संशोधन केंद्राला भेट
फोंडा (गोवा) – पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर, गांधर्व महाविद्यालयाचे निबंधक (रजिस्ट्रार) श्री. विश्वास जाधव आणि गोवा येथील तबलावादक पं. अमोद दंडगे यांनी १७ एप्रिल २०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट दिली. या वेळी विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी संशोधन कार्याविषयीची माहिती सांगितली. या सर्वांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संपूर्ण कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. या वेळी विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी या मान्यवरांचा सनातननिर्मित देवतांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट दिल्यानंतर मान्यवरांनी काढलेले गौरवाद्गार !
१. पं. सुरेश तळवलकर आणि पं. डॉ. विकास कशाळकर सगळे कार्य आणि संशोधन केंद्र बघतांना वेळ अल्प असल्याची खंत व्यक्त करत होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘येथील सगळे अनुभवायला येथे अधिक कालावधीसाठी रहाण्यासाठी यायला हवे.’’
२. पं. तळवलकर म्हणाले, ‘‘आम्ही गोव्यात येऊन संशोधन केंद्रात आलो नसतो, तर आमची मोठी चूक झाली असती. आज मला येथे येऊन धन्य झाल्यासारखे वाटत आहे.’’
३. श्री. विश्वास जाधव यांनी सांगितले, ‘‘मला या ठिकाणी वेळ काढून नक्की यायचे आहे.’’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१८.४.२०२३) ०
तालयोगी पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर, श्री. विश्वास जाधव आणि तबलावादक पं. अमोद दंडगे यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर, गांधर्व महाविद्यालयाचे निबंधक श्री. विश्वास जाधव आणि तबलावादक पं. अमोद दंडगे यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमालाही भेट दिली. १. या मान्यवर कलाकारांना आश्रमातील ध्यानमंदिराची माहिती सांगितल्यावर सगळ्यांनी भूमीवर डोके टेकवून देवतांना नमस्कार केला. २. त्यांना आश्रमातील लादीवर आपोआप उमटलेले ॐ दाखवल्यावर त्याविषयी पं. डॉ. कशाळकर यांनी जिज्ञासेने जाणून घेतले. |
पं. सुरेश तळवलकर, पं. डॉ. विकास कशाळकर, श्री. विश्वास जाधव आणि पं. अमोद दंडगे यांचा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती भाव !१. संगीत आणि अध्यात्म यांविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रश्न विचारून स्वत:चे शंकानिरसन करून घेणे : ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्राणशक्ती अत्यल्प असतांना आणि अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही पं. सुरेश तळवलकर, पं. डॉ. विकास कशाळकर, श्री. विश्वास जाधव आणि पं. अमोद दंडगे यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी या सुप्रसिद्ध कलाकारांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना जिज्ञासेने संगीत आणि अध्यात्म यांविषयी प्रश्न विचारून स्वत:चे शंकानिरसन करून घेतले. २. पं. सुरेश तळवलकर आणि पं. डॉ. विकास कशाळकर म्हणाले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट झाल्याने आमच्या येथे येण्याचे सार्थक झाले. आम्हाला साधनेची नवी दिशा समजली.’’ – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (१८.४.२०२३) |
कलाक्षेत्रात नामांकित असलेल्या पं. सुरेश तळवलकर, पं. डॉ. विकास कशाळकर आणि श्री. विश्वास जाधव यांचे लक्षात आलेले वेगळेपण !‘कलाक्षेत्रात नामांकित असलेले तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. डॉ. विकास कशाळकर आणि श्री. विश्वास जाधव यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना स्वतःविषयी काही सांगितले नाही. त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘संगीताला अध्यात्माची जोड कशी द्यायची ? जीवनात साधनेचे काय महत्त्व आहे ? साधना केल्यामुळे प्रारब्ध पालटू शकते का ?’, असे प्रश्न जिज्ञासेने आणि नम्रतेने विचारून शंकानिरसन करून घेतले. या भेटीचे हे वेगळेपण मला अनुभवता आले. ‘या मान्यवरांना मुळातच साधनेचा पाया असल्याने त्यांनी संगीत साधनेविषयी विविधांगी प्रश्न विचारून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भेटीचा खरा लाभ करून घेतला’, असे मला जाणवले. ‘संतांच्या भेटीच्या वेळी स्वतःच्या साधनेसाठी मार्गदर्शन घेणे’, हाच त्यांच्या भेटीचा खरा लाभ असतो’, हे या प्रसंगी मला प्रकर्षाने शिकायला मिळाले.’ – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (१८.४.२०२३) |