बालाघाट (मध्यप्रदेश) येथे पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी कमांडर ठार !
दोघींना पकडून देण्यासाठी प्रत्येकी १४ लाख रुपयांचे होते बक्षीस !
भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील बालाघाट येथे २२ एप्रिलच्या पहाटे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी कमांडर ठार झाल्या. भोरभ देव क्षेत्राची कमांडर सुनीता आणि खटिया मोर्च क्षेत्राची कमांडर सरिता या दोघींवर प्रत्येकी १४ लाख रुपयांचे बक्षीस होते. या वेळी घटनास्थळावरून दोन बंदुका, काडतूसे, तसेच खाद्यसामग्री हस्तगत करण्यात आली. या कारवाईत अन्य काही नक्षलवादीही घायाळ झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
MP: Two women Naxalites carrying ₹14 lakh bounty each killed in an encounter with Hawk Force in Balaghathttps://t.co/MkRVsF5P39
— OpIndia.com (@OpIndia_com) April 22, 2023
संपादकीय भूमिकानक्षलवादाच्या विरोधात केंद्रशासनाकडून मोहिमा आखल्या जात आहेत; परंतु त्या मोहिमांची परिणामकारकता वाढवून नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे ! |