मोन्सेरात यांच्या मोर्च्यात ८०० जणांचा सहभाग, तर ४५ पोलीस अधिकारी घायाळ झाल्याची पोलीस अधिकार्याची न्यायालयात साक्ष
वर्ष २००८ मध्ये पणजी पोलीस ठाण्यावर आक्रमण केल्याचे प्रकरण
मडगाव, २१ एप्रिल (वार्ता.) – महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांचे समर्थक यांनी वर्ष २००८ मध्ये पणजी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. या वेळी मोर्च्यामध्ये सुमारे ८०० जण सहभागी झाले होते. मोर्च्यामधील जमावाने प्रक्षुब्ध होऊन पणजी पोलीस ठाण्यावर दगड आणि बाटल्या फेकल्या. यामध्ये महिलांसहीत ४५ पोलीस अधिकारी घायाळ झाले, अशी साक्ष पणजी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक तथा विद्यमान पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी मडगाव येथील विशेष न्यायालयात दिली. पणजी पोलीस ठाण्यावरील आक्रमण प्रकरणी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यापुढे चालू आहे. या वेळी पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी ही साक्ष दिली. सुनावणीच्या वेळी मंत्री बाबूश मोन्सेरात आणि इतर संशयित न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ एप्रिल या दिवशी होणार आहे.
संपादकीय भूमिका
|
सविस्तर वृत्त वाचा –
♦ आमदार बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी मंत्री जेनिफर यांचे आरोपपत्र रहित करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
https://sanatanprabhat.org/marathi/537650.html