लाचेविना काम न करणार्या कर्तव्यचुकार अधिकार्यांना कठोर शिक्षाच करायला हवी !
७ सहस्र रुपयांची लाच घेणार्या वरळी आरे दुग्दुधशाळा विभागाच्या साहाय्यक व्यवस्थापकांना अटक !
मुंबई – ७ सहस्र रुपयांची लाच घेतांना वरळी आरे दुग्दुधशाळा विभागाच्या साहाय्यक व्यवस्थापक रणजितसिंग कोमलसिंग राजपूत यांना २० एप्रिल या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. यातील तक्रारदार आरे दुग्दुधशाळा विभागातून निवृत्त झाले होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळणार्या लाभाच्या रकमेसाठी महालेखा कार्यालयात अर्ज केला होता. अर्जानंतर संबंधित कर्मचार्यांच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेत रणजितसिंग राजपूत यांनी त्यांच्याकडे १० सहस्र रुपयांची लाचेची मागणी केली होती . लाच दिल्यानंतर त्यांच्या अर्जाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करून धारिका पुढे पाठवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रणजितसिंगसिं राजपूत यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती .