औद्योगिक वापराच्या ७८ भूखंडाचे निवासी भूखंडात रूपांतर !
पिंपरी – शहरातील ७८ औद्योगिक भूखंडाचे गेल्या १५ वर्षात निवासी भूखंडात रूपांतर झाले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र अल्प होऊन त्या जागांवर बहुमजली इमारतींचा गृहप्रकल्प साकारला जात आहे. भूखंड वापरामध्ये पालट केलेल्या आस्थापनात पिंपरी मधील महिंद्रा, चिंचवड गावाजवळील एल्प्रो या आस्थापनांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७८ प्रस्तावांना संमती मिळाली आहे. त्या जागांवर विविध सुविधांसह गृहप्रकल्प उभे राहिले आहेत.
ज्या औद्योगिक भूखंडाला निवासी क्षेत्रामध्ये हस्तांतरित करायचे आहे त्याची मोजणी करून महापालिकेकडे प्रस्ताव पाठवून त्याची छाननी करून हस्तांतर प्रक्रिया आणि सरकारी नियमानुसार शुल्क भरून भूखंडाच्या वापरातील पालटास अनुमती दिली जाते. आतापर्यंत ७८ भूखंडाचे रूपांतर निवासिक क्षेत्रामध्ये झाले आहे अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.