सातारा येथे जावयाकडून चुलत सासर्यांची निर्घृण हत्या !
सातारा, २० एप्रिल (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथे भूमीच्या वादातून रवी यादव यांनी त्याचे चुलत सासरे म्हणजे सुनील शंकर भोईटे यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. रवी यादव आणि त्यांचा सहकारी सुनील यादव यांनी सुनील भोईटे यांना रस्त्यात अडवून त्यांच्या पोटात आणि छातीत ३ गोळ्या झाडल्या. गोळ्या वर्मी लागल्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. गोळ्या झाडल्यानंतर दोघेही बंदूकीसह स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले.
संपादकीय भूमिकापैशांसाठी हत्या करण्यापर्यंत मजल जाणे, हे समाजातील नीतीमत्ता खालावत चालल्याचे लक्षण ! |