भारत सरकारने माझे दुहेरी नागरिकत्व कार्ड रहित केले ! – हिंदुद्वेषी कन्नड अभिनेत्याचा दावा

हिंदुद्वेषी कन्नड अभिनेता चेतन कुमार

बेंगळुरू – कन्नड अभिनेता चेतन कुमार याने काही दिवसांपूर्वी हिंदुत्वावर अवमानकारक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर त्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. आता त्याने दावा केला आहे की, भारत सरकारने त्याचे दुहेरी नागरिकत्वाचे कार्ड (ओव्हरसीज सिटिझनशीप ऑफ इंडिया कार्ड) रहित केले आहे.

चेतन कुमार याने त्याच्या ट्वीटमध्ये ‘हिंदुत्व असत्यावर आधारलेले आहे’ असे विधान केले होते. त्यानंतर सामाजिक माध्यमांवर त्याच्यावर टीका झाली होती. यापूर्वी हिजाब प्रकरणाची सुनावणी करणार्‍या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या विरोधात त्याने ट्वीट केले होते. त्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.


सविस्तर वृत्ते वाचा –

(म्हणे) ‘बौद्ध मंदिर तोडून तिरुपती मंदिराची निर्मिती झाली आहे !’ – कर्नाटकातील अभिनेते चेतन
https://sanatanprabhat.org/marathi/675497.html

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांवर आक्षेपार्ह ट्वीट करणार्‍या कन्नड अभिनेत्याला अटक
https://sanatanprabhat.org/marathi/555760.html

‘हिंदुत्व खोट्या आधारावर उभारले आहे’, असे ट्वीट करणारे कन्नड अभिनेता चेतन कुमार अटकेत !
https://sanatanprabhat.org/marathi/664813.html

(म्‍हणे) ‘भगवा हा हिंदुत्‍वाचा रंग होऊ शकत नाही !’ – दाक्षिणात्‍य अभिनेते चेतन कुमार
https://sanatanprabhat.org/marathi/647252.html