भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु संघटनांच्या विरोधानंतर अवैध मशीद हटवली !
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील अंबेरपेटच्या गोलनकाजवळी मुसी नदीच्या किनारी अवैधरित्या अस्थायी मशीद बांधण्यात आली होती. येथे लोखंडी केबिन आणून त्याला मशिदीचे रूप देण्यात आले होते. येथे नमाजपठणही चालू कण्यात आले होते. ३ दिवसांनंतर यासंदर्भात बजरंग सेनेला याची माहिती मिळाल्यानंतर अन्य हिंदु संघटनांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आदींना या संदर्भात निवेदन देऊन मशीद हटवण्याची मागणी केली. यानंतर प्रशासनाने कारवाई करत येथून मशीद हटवली.
हिंदु संघटनांची प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने
ज्या जागेवर अस्थायी मशीद होती, ती जागा पाटबंधार्यासाठी वापरण्याचा न्यायालयाचा आदेश आहे. तेथे अन्य कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. तरीही अशा प्रकारे तेथे अवैध मशीद बांधण्याचा प्रयत्न झाला. याला बजरंग सेना, हिंदु जनजागृती समिती, हिंदू संघटन एकता मंच, हिंदु वाहिनी, जय श्रीराम सेना, राष्ट्रीय शिवजी सेना आणि हिंदु जॅक या संघटनांची संघटित होऊन विरोध केल्यानेच प्रशासनाला कारवाई करावी लागली.
संपादकीय भूमिका
|