निवृत्तीवेतन एकटेच वापरता म्हणून मुलाकडून वडिलांना पट्टा आणि काठी यांनी मारहाण !
सातारा, २१ एप्रिल (वार्ता.) – निवृत्तीवेतन एकटेच खाता, मला देत नाही, असे म्हणत मुलाने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांना पट्टा आणि काठी यांनी मारल्याची घटना घडली. शाहूपुरी येथील गुलमोहोर कॉलनी येथे दादासाहेब गोडसे हे पोलीसदलातून निवृत्त झालेले अधिकारी पेपर वाचत असतांना त्यांच्या मुलाने त्यांना उपरोक्त कारणावरून पट्टयाने मारहाण केली. नंतर काठीने पायावर, हातावर आणि पाठीवरही मारले. या वेळी गोडसे यांची पत्नी रेखा यांनीही मुलगा मारहाण करत असतांना पतीचे हात आणि पाय धरून मारहाण करण्यास साहाय्य केले. नंतर गोडसे स्वत: घायाळ अवस्थेत शासकीय रुग्णालयात भरती झाले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मुलगा आणि पत्नी यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकाजन्मदात्यालाच मारहाण करणारी मुले हे नैतिकता रसातळाला गेल्याचे उदाहरण आहे. समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता यातून लक्षात येते. |