गीता फाऊंडेशनच्या वतीने १२ कोटी ‘विष्णुसहस्रनाम’ करण्याचा संकल्प !
मिरज – गीता फाऊंडेशन मिरज यांच्या वतीने १२ कोटी ‘विष्णुसहस्रनाम’ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यांपैकी ७ कोटी आवर्तने पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने मिरज येथील श्री पटवर्धन सभागृह येथे २३ एप्रिल या दिवशी सकाळी ९ ते ११ या कालावधीत ‘विष्णुसहस्रनाम’ पाठ होणार आहे. प्रत्येक पाठानंतर उपनिषदातील एका मंत्राचा अर्थ सांगितला जाणार आहे. दुपारी १२ ते १ पूर्णाहुती होऊन महाप्रसाद होईल. हा कार्यक्रम नि:शुल्क असून अधिकाधिक भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. आपटे गुरुजी उपाख्य स्वामी चैतन्यानंद (भ्रमणभाष क्रमांक – ८६२५० ३२०८२) यांनी केले आहे.