उन्हाळ्यात तिखट, तेलकट आणि चमचमीत पदार्थ खाणे टाळावे !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १८५
‘वडापाव, मिरचीभजी, चिवडा, चिप्स, पाणीपुरी, भेळ यांसारखे तिखट, तेलकट आणि चमचमीत पदार्थ पित्त वाढवणारे असतात. उन्हाळ्यात असे पदार्थ खाल्ल्याने तोंड येणे, अंगावर पुरळ येणे, लघवीच्या वेळेस जळजळणे, चक्कर येणे, अंगाला खाज येणे, केसतूड (गळू) होणे यांसारखे त्रास होऊ शकतात. यामुळे असे पदार्थ उन्हाळ्यात खाऊ नयेत. उन्हाळ्यात नेहमीच्या जेवणातही लाल तिखट आणि मसाला यांचा वापर न्यून करावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan |