अभिनेता साहिल खान याच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार !
मुंबई – अभिनेता साहिल खान याच्या विरोधात मुंबईतील एका व्यावसायिकाच्या पत्नीने लैंगिक छळ केल्याची, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ‘साहिल खान याने सामाजिक माध्यमांवर माझे छायाचित्र प्रसारित करून त्यावर अश्लील लिखाण केले’, असा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. ‘ए.एन्.आय्.’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये एका आर्थिक व्यवहारावरून साहिल खान आणि तक्रारदार महिला यांचे भांडण झाले होते. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.