शासकीय रुग्णालयातील मृत अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके : पोलिसांकडून अन्वेषण चालू
कोल्हापूर – छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन विभागाच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडल्याचा प्रकार २० एप्रिलला सकाळी १० वाजता समोर आला. घटनेची माहिती कळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस तेथे पोचले. पोलिसांनी अर्भकाचे अवशेष कह्यात घेऊन रुग्णालयाच्या आवारात हे अवशेष कुणी टाकले, याचा शोध चालू केला आहे.
संपादकीय भूमिकादायित्वशून्य प्रशासन ! |