कायद्यातील स्पष्ट व्याख्येअभावी गौतमी पाटील आणि उर्फी जावेद यांवर कारवाई शक्य नाही ! – सौ. रूपाली चाकणकर
समाजातील अश्लीलता रोखण्याविषयी राज्य महिला आयोगाची असाहाय्यता !
मुंबई – गौतमी पाटील आणि उर्फी जावेद या दोघीही तुमच्या दृष्टीकोनातून अश्लील वाटत असल्या, तरी अन्यांच्या दृष्टीने त्या योग्य असू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही; परंतु त्यांना समज देऊ शकतो. अश्लीलता स्पष्ट करणारी व्याख्या कायद्यामध्ये नाही, असे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी केले. एका वृत्तवाहिनीवर सौ. रूपाली चाकणकर यांना ‘गौतमी पाटील आणि उर्फी जावेद या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विकृतीकरण करत आहेत का ?’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याविषयी बोलतांना सौ. चाकणकर यांनी वरील उत्तर दिले. गौतमी पाटील ही अश्लील पद्धतीने लावणी नृत्य सादर करते, तर उर्फी जावेद ही अभिनेत्री असून ती तोकडे आणि अश्लील कपडे परिधान करते. यामुळे या दोघांवर नेहमीत टीका होत असते. त्या पार्श्वभूमीवर चाकणकर बोलत होत्या.
या वेळी सौ. रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘‘राज्यघटना ‘माणूस’ म्हणून जगण्याचा अधिकार देत असतांना शील आणि अश्लील यांची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल, तर दुसर्याला ती गोष्ट शील वाटते. स्थळ, काळ आणि वेळ परत्वे ही परिभाषा पालटते. गौतमी पाटील करत आहे, ते नृत्य नाही. या प्रकरणात येणार्या तक्रारींची नोंद घेऊन राज्य महिला आयोग त्या संबंधित व्यक्ती, विभाग किंवा संस्था यांच्याकडे पाठवत असतात; पण राज्यघटनेने व्यक्ती आणि भाषा स्वातंत्र्याचा जो अधिकार दिला आहे, त्यामुळे कुणी काय घालावे ? काय बोलावे ? काय खावे ? हे कोण कुणाला सांगू शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्था पहाता त्यासाठीचे काही परिमाण ठरले आहेत. त्या पलीकडे जाऊन आपण कोणतीही कारवाई करू शकत नाही.’’
संपादकीय भूमिकाधर्मशिक्षणामुळेच समाजातील अनैतिकता थांबवली जाऊ शकते ! |