गुजरात दंगलीतील एका प्रकरणात सर्व ६८ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्तता !
आरोपींमध्ये भाजपच्या नेत्या माया कोदनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांचा समावेश
कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीच्या वेळी कर्णावती येथील नरोदा भागामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात गुजरातच्या भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री माया कोदनानी, तसेच बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांचा समावेश आहे. या दंगलीत ११ जण ठार झाले होते. या प्रकरणी ८६ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यांतील १८ लोकांचा मृत्यू झाला.
#JustIN | A special court of Gujarat has ACQUITTED all 68 accused including former minister Maya Kodnani in the 2002 Gujarat Riots-Naroda Gam Massacre Case.#GujaratRiots #NarodaPatiya pic.twitter.com/uxJFoWuGDR
— Live Law (@LiveLawIndia) April 20, 2023
संपादकीय भूमिकावर्ष २००२ च्या प्रकरणाचा निकाल २१ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे ,अन्याय ! |