अनुपस्थित राहिलेल्या अधिकार्यांवर कारवाई करा ! – माजी उपसभापती चौगुले
मंडणगड आमसभेत १० खात्यांचे अधिकारी अनुपस्थित !
रत्नागिरी – मंडणगड तालुका आमसभेचे निमंत्रण वेळेवर देऊनही प्रशासनाचे १० खात्यांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने ‘या अधिकार्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा ठराव करावा’, अशी मागणी माजी उपसभापती दोस्तमहंमद चौगुले यांनी केली.
प्रदीर्घ कालावधीनंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली.
आज मंडणगड तालुक्याची आमसभा माझ्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मंडणगड येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. 1/5 pic.twitter.com/k0Yd3tKrL3
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) April 17, 2023
या वेळी सत्ताधारी आणि विरोधक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. केंद्रशासनाच्या जलजीवन मिशन योजनेचे नियोजन आणि अंमलबजावणीच्या प्रश्नावर ही सभा वादळी ठरण्याचा अंदाज वर्तवला जात असतांना या सभेविषयी सत्ताधारी आणि विरोधक जागरूक असल्याचे दिसून आले; मात्र प्रशासनाचेच १० अधिकारी अनुपस्थित राहिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
संपादकीय भूमिकाअशा अधिकार्यांवर कारवाई होणार कि पुन्हा अशीच चूक करण्यासाठी त्यांना प्रशासन मोकळे सोडणार ? |