(म्हणे) ‘मुसलमान शिर झुकवणारा नव्हे, तर कापणारा समाज !’ – काँग्रेस खासदार इमरान प्रतापगडी यांची मुसलमानांना चिथावणी
अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येचे प्रकरण
बेंगळुरू (कर्नाटक) – मुसलमान शिर झुकवणारा नव्हे, तर कापणारा समाज आहे, अशा प्रकारे काँग्रेसचे कर्नाटकातील राज्यसभेचे खासदार इमरान प्रतापगडी यांनी मुसलमानांना चिथावणी दिली आहे. यावर भाजपच्या कर्नाटकातील नेत्या आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेस अशा नेत्यांना स्वत:ची ‘स्टार प्रचारक’ म्हणून निवड करत आहे. त्या म्हणाल्या की, प्रतापगडी अतिक अहमद आणि अशरफ यांना स्वत:चा गुरु आणि मित्र मानत होते.
प्रतापगडी यांना अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये अतीक अहमद याच्यासमवेत पाहिले गेले आहे.
संपादकीय भूमिका
|