आतंकवादी संघटना ‘हिजबुल्लाह’ला पैसे पुरवणार्या भारतियाला ब्रिटनमध्ये अटक !
लंडन (ब्रिटन) – ब्रिटन पोलिसांनी सुंदर नागराजन् नावाच्या एका भारतीय नागरिकाला ‘हिजब्बुलाह’ नावाच्या आतंकवादी संघटनेला पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अमेरिकेने केलेल्या मागणीवरून ६६ वर्षीय नागराजन् याला अटक करण्यात आली. लवकरच त्याला अमेरिकेकडे सोपवण्यात येईल.
पोलिसांनी नझीम अहमद नावाच्या लेबेनॉनी व्यक्तीलाही अटक केली आहे. नागराजन् अहमदसाठी काम करत असल्याचा आरोप आहे. अहमदचा गट लेबेनॉनमध्ये कार्यरत आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना ‘हिजब्बुलाह’ला अर्थसाहाय्य करत असल्याचे समोर आल्यावर ब्रिटन आणि अमेरिका यांनी ही संयुक्त कारवाई केली.
Indian arrested in London on suspicion of funding terrorist organisation Hizbollah
Read @ANI Story | https://t.co/6xb2IcFnvI#Indian #London #Hizbollah pic.twitter.com/Ec2wAGQC6d
— ANI Digital (@ani_digital) April 20, 2023