खलिस्तानी अमृतपालच्या पत्नीला अमृतसर विमानतळावर अधिकार्यांनी लंडन येथे जाण्यापासून रोखले !
चौकशी करून परत पाठवले !
अमृतसर (पंजाब) – ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या खलिस्तानी संघटनेचा पसार असलेला प्रमुख अमृतपाल याची पत्नी किरणदीप हिला २० एप्रिल या दिवशी अमृतसर विमानतळावर अधिकार्यांनी रोखले. तिची चौकशी केल्यानंतर तिला पुन्हा माघारी, म्हणजे पंजाबमधील जल्लूपूर खेडा या गावात पाठवण्यात आले. किरणदीप एअर इंडियाच्या विमानाने लंडन येथे जाणार होती. किरणदीप ही अनिवासी भारतीय आहे. ती भारतात १८० दिवस राहू शकते, असे सांगितले जात आहे.
लंदन भागने की फिराक में थी भगोड़े अमृतपाल की पत्नी किरणदीप, एयरपोर्ट पर पुलिस ने रोका #KirandeepKaur #Amritpal_Singh (@manjeet_sehgal)https://t.co/UEsSYPOmU5
— AajTak (@aajtak) April 20, 2023
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरणदीप हिने अधिकार्यांना सांगितले की, ती तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जात आहे. तिच्या विरोधात भारतात कोणताही गुन्हा नोंद नाही.