तंजावर (तमिळनाडू) येथे ‘श्री विवेकानंद पेरावई’चे अध्‍यक्ष श्री. परमानंदम् यांच्‍या हस्‍ते तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

तंजावर (तमिळनाडू) – ‘श्री विवेकानंद पेरावई (महासंघ)’चे अध्‍यक्ष श्री. परमानंदम् यांच्‍या हस्‍ते ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले. येथील हॉटेल अण्‍णामलाई टॉवर्स येथे हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्‍यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून श्री. परमानंदम् उपस्‍थित होते. या सोहळ्‍याचे आयोजन ‘हिंदु इळैंगर येळूच्‍ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ)’चे राज्‍यप्रमुख श्री. पाला संतोष यांनी केले होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे हेही या कार्यक्रमाला उपस्‍थित होते.

या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि ‘हलाल अर्थव्‍यवस्‍था’ यांचा देशांतर्गत आणि त्‍यापासून राष्‍ट्रीय सुरक्षेला असलेला धोका अन् त्‍यावर उपाय यांविषयी, तसेच हिंदूंची सध्‍याची दयनीय स्‍थिती विशद केली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. बालाजी कोल्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाला ‘हिंदु इळैंगर येळूच्‍ची पेरवर्ई’चे अनेक कार्यकर्ते हिंदु धर्माभिमानी, राष्‍ट्रप्रेमी नागरिक आणि विविध संस्‍थांचे कार्यकर्ते उपस्‍थित होते.

क्षणचित्रे

१. श्री. पाला संतोष हे ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ हा तमिळ भाषेतील ग्रंथ पाहून अतिशय प्रभावित झाले. त्‍यांनी ‘या ग्रंथाच्‍या अनेक प्रती विकत घेऊन त्‍याचा मोठ्या प्रमाणात प्रचार करणार आहे’, असे सांगितले.

२. कार्यक्रमस्‍थळी सुरक्षेसाठी ४ ते ५ पोलीस कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले होते. तसेच गुन्‍हे अन्‍वेषण विभागाचे कर्मचारीही उपस्‍थित होते.

‘श्री विवेकानंद पेरावई’चे अध्‍यक्ष श्री. परमानंदम् यांनी श्री. रमेश शिंदे यांच्‍याकडून ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी केले जात असलेल्‍या असामान्‍य कार्याचे कौतुक केले. श्री. परमानंदम् म्‍हणाले, ‘‘श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल अर्थव्‍यवस्‍था’ ग्रंथाच्‍या माध्‍यमातून हिंदूंमध्‍ये जागृती निर्माण केली.’’