सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू !
सातारा, १९ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. गत २४ घंट्यांत एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे धोका वाढला असून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी कोरोनाविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर सध्या ५.७१ टक्के एवढा आहे; मात्र कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. गत २४ घंट्यांत जिल्ह्यात ३५ रुग्णांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी घेण्यात आली असून त्यातील
२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात ६७ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. आज ३७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.