काँग्रेस ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या जवळ ! – भाजप
धारवाड (कर्नाटक) – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या १ सहस्र ७०० कार्यकर्त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. यासह काँग्रेसचे डी.के. शिवकुमार यांनी ‘कुकर स्फोटा’तील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला. सिद्धरामय्या हे या सर्वांचे पालक आणि जवळचे मित्र होते.
‘कांग्रेस का मतलब कमीशन, भ्रष्टाचार और अपराधीकरण’, कर्नाटक के शिगगांव में गरजे जेपी नड्डा@JPNadda @BJP4India @BJP4Karnataka #KarnatakaElection2023https://t.co/YMFdTFWIar
— Dainik Jagran (@JagranNews) April 19, 2023
अशा लोकांना समाजात स्थान देऊ नये, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी येथे निवडणुकीच्या प्रचारसभेत केले.