कोरड्या खोकल्‍यावर सनातन भीमसेनी कापराचा उपाय

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १८४

वैद्य मेघराज पराडकर

‘घशात खवखव सुटून कोरडा खोकला येतो, तेव्‍हा सनातन भीमसेनी कापराचा पुढीलप्रमाणे उपाय करावा. फोडणीची लहान कढई किंवा लोखंडी पळी गॅसवर गरम करावी. ती गरम झाल्‍यावर गॅस बंद करून तिच्‍यामध्‍ये लहानसा ‘सनातन भीमसेनी कापरा’चा खडा टाकावा. गरम कढईत कापराचा खडा पडल्‍यावर लगेच त्‍याची वाफ बनते. कढईजवळ तोंड नेऊन ही वाफ हुंगावी. कापराची वाफ जसजशी घशातून आत जाते, तसतशी घशाची खवखव न्‍यून होऊ लागते आणि खोकला लगेच कमी होतो. हा उपाय दिवसातून २ – ३ वेळा ३ – ४ दिवस करण्‍यास आडकाठी नाही. कापूर थंड असल्‍याने हा उपाय उन्‍हाळ्‍यात विशेष लाभदायक आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan