बनावट औषधांच्या प्रकरणी कर्नाटकमध्ये २५ आस्थापने काळ्या सूचीत !
बेंगळुरू (कर्नाटक) – बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे पुरवणार्या २५ पेक्षा अधिक औषधनिर्मिती आस्थापनांना काळ्या सूचीत टाकण्याचा आदेश ‘कर्नाटक राज्य वैद्यकीय पुरवठा निगम’ने दिला. या आस्थापनांचे डोळे आणि कान यांचे ड्रॉप्स, पाऊडर, गोळ्या, सुया, इंजेक्शन, हँड सॅनिटायझर, विटॅमिन सी गोळ्या आणि सर्जिकल ग्लोज निकृष्ट दर्जाचे सापडले आहेत.
गेल्या ५ वर्षांपासून बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे पुरवल्याच्या पार्श्वभूमीवर सिस्टाचम् लॅबोरेटरीज, पोड्डर फार्मास्यूटिकल्स प्रा.लि., गॅलेक्सीफार्मा, एस्.आर्.एस्. मेडिटेक लि., एलिगेंट ड्रग्स प्रा.लि., श्रेया लाइफ सायन्स प्रा.लि., मॉर्डन लॅबोरेटरीज, एस्.एम्. फार्मास्यूटिकल्स, क्वेस्ट लॅबोरेटरीज प्रा.लि., ॐ बायोमेडिकल प्रा.लि. यांच्यासह अनेक आस्थापनांचा काळ्या सूचीत समावेश करण्यात आला आहे.