अयोध्येत ९५ वर्षीय महंतांना मृत ठरवून भूमाफियांनी त्यांची कोट्यवधी रुपयांची भूमी बळकावली !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील हनुमानगढीचे ९५ वर्षीय महंत जुगल बिहारी दास यांची कोट्यवधी रुपयांची भूमी भूमाफियांनी लाटल्याची घटना समोर आली आहे. महंतांचा मृत्यू झाल्याचे सांगून गौरीशंकर याने ही भूमी लाटली आहे.
१. महंत जुगल बिहारी दास यांनी सांगितले की, आरोपींनी मला माझ्या भूमीवरून हाकलून लावले. बंदुकीचा धाक दाखवून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मी गेली १० वर्षे स्वत: जिवंत असल्याचे सिद्ध करत भूमी परत मिळवण्यासाठी न्यायालयात चकरा मारत आहे.
२. श्रीराममंदिरामुळे अयोध्येतील भूमींचे भाव फार वाढले आहेत. अयोध्येतील भाजपचे खासदार लल्लू सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अधिकारी आणि भूमाफिया यांच्यातील संबंधांविषयी पत्र लिहून विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याची मागणी केली होती.
अयोध्या में 95 वर्षीय महंत को मृत बताकर भूमाफिया ने हड़प ली करोड़ों की जमीन, 10 साल से लगा रहे कोर्ट के चक्कर#Ayodhya @ashishaajtak
— AajTak (@aajtak) April 19, 2023
संपादकीय भूमिका
|