भारत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त होणार ! – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचा विश्वास
पणजी, १८ एप्रिल (वार्ता.) – जागतिक उद्दिष्टाच्या ५ वर्षे आधीच म्हणजे वर्ष २०२५ पर्यंत भारत देश क्षयरोगमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीय यांनी येथे व्यक्त केला. केंद्रीयमंत्री मांडवीय हे ‘जी-२०’ आरोग्य कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने गोव्यात आले आहेत. त्यांनी ‘जी-२०’ प्रतिनिधींसमवेत येथील जनऔषधी केंद्राला (जेनेरिक मेडिसिन आऊटलेट) भेट दिली. याप्रसंगी केंद्रीयमंत्री मांडविया बोलत होते.
TB Harega, Desh Jeetega!
Distributed food baskets among the TB patients at AB-Health & Wellness Centre, Corlim, Goa.
PM @NarendraModi Ji's Govt is working relentlessly towards making India TB-free by 2025, 5 years before the global target of 2030. #TBMuktBharat #G20India pic.twitter.com/ZPxrnDzcJF
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) April 18, 2023
‘जेनेरिक औषधी मॉडेल’ अंगीकारू इच्छिणार्या देशाला भारत साहाय्य करण्यास इच्छुक !
जेनेरिक औषधे दर्जेदार आणि किफायतशीर आहेत. ‘जेनेरिक औषधी मॉडेल’ अंगीकारू इच्छिणार्या देशाला भारत साहाय्य करण्यास इच्छुक आहे, असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीय यांनी या वेळी व्यक्त केले.
G20 में आये डेलिगेट्स ने जन औषधि केंद्र पर जाकर इस जन-कल्याणकारी परियोजना के बारे में जानकारी ली।
वो अपने देश में भी इस योजना को लागू करना चाहते हैं। भारत इसमें उनकी हर संभव मदद करेगा। #G20India pic.twitter.com/M9AejYEgJJ
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) April 18, 2023
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्यासमवेत प्रतिनिधींनी खोर्ली येथील ‘एबी हेल्थ अँड वेलनेस सेंटर’लाही भेट दिली.
भारताच्या पहिल्या फिरत्या ‘बी.एस्.एल्.-३’ प्रयोगशाळेचे प्रात्यक्षिक
भारताने रॅपिड ॲक्शन मोबाइल बी.एस्.एल्.-३’ ॲडव्हान्स ऑगमेंटेड नावाची पहिली फिरती ‘बायोसेफ्टी लेव्हल-३ (बी.एस्.एल्.-३) प्रयोगशाळा चालू केली आहे. ही फिरती प्रयोगशाळा ‘जी-२०’ बैठकीत प्रदर्शित करण्यात आली. प्रयोगशाळा नव्याने उदयास येत असलेल्या ‘व्हायरल इन्फेक्शन्स’ची तपासणी करण्यासाठी सिद्ध करण्यात आली आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठीही ही प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे आता चाचणी प्रक्रिया सोपी झालेली आहे, तसेच चाचणी केल्यावर निकाल सिद्ध करण्यासाठी आता अल्प वेळ लागणार आहे. भारताने ही प्रयोगशाळा चालू करून वैद्यकीय संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे आणि या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे देशाच्या आरोग्यसेवा क्षेत्रात क्रांतीकारक पालट घडणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गोव्यातील आरोग्यसेवेचे मनसुख मांडवीय यांच्याकडून कौतुकगोव्यात प्रत्येक ६ सहस्र लोकसंख्येसाठी एक ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ उपलब्ध आहे. गोव्यात ‘टेली कन्सल्टेशन’ सुविधाही चांगल्या प्रकारे चालू आहे.
या सुविधेमुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ आधुनिक वैद्य ग्रामीण आरोग्य केंद्राशी जोडले जाऊ शकत आहेत. गोव्यातील आरोग्य केंद्रांमध्ये ‘ओरल, ब्रेस्ट आणि कर्व्हीकल’ या ३ प्रकारच्या कर्करोगांची तपासणी करणे आणि प्राथमिक उपचार करणे, ही सुविधा उपलब्ध आहे, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी गोव्यातील आरोग्यसेवेचे कौतुक केले. |