खंडवा (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु युवकांना मारहाण !
|
खंडवा (मध्यप्रदेश) – येथील एका मुसलमान मुलीने २ हिंदु युवकांसमवेत रस प्यायल्याच्या प्रकरणी धर्मांध मुसलमानांनी दोघा हिंदु युवकांना मारहाण केली.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार १६ एप्रिल या दिवशी एक मुसलमान मुलगी अतुल आणि सत्यम या हिंदु युवकांसमवेत रस पीत होती. तेवढ्यात काही मुसलमान तरुण तेथे पोचले. त्यांनी हिंदु युवकांशी भांडण चालू केले. त्यांना मारहाण केली आणि नंतर त्यांचे अपहरण करून त्यांना एका दर्ग्यात नेले. पोलिसांनी तेथे जाऊन हिंदु मुलांना त्यांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर रात्री धर्मांध मुसलमानांनी मोघट पोलीस ठाण्याला घेराव घातला. स्थानिक धर्मांध नगरसेवक अशफाक त्या तरुणीला घेऊन पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी हिंदु युवकांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी मुलीवर दबाव आणला. धर्मांध मुसलमानांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेकही केली. (कट्टरवादी मुसलमानांच्या जमावाला रोखू न शकणे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
पोलिसांनी हिंदु युवकांना मारहाण केल्याच्या प्रकरणी महंमद इरफान आणि अझहर अली यांना, तसेच नगरसेवक अफरफ उमेद यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाअसे हिंदु मुलीने केले असते आणि हिंदूंनी विरोध केला असता, तर ‘मैत्रीला रंग नसतो’, असे उपदेशाचे डोस सर्वधर्मसमभाववाल्यांनी हिंदूंना पाजले असते. आता ते गप्प का ? |