पिंपरी (पुणे) येथील रावेत भागात वादळी वार्यामुळे होर्डिंग्ज कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू !
पिंपरी चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील रावेत भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ‘होर्डिंग्ज’ कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे काही नागरिकांनी ‘होर्डिंग्ज’च्या जवळ असलेल्या ‘पंक्चर’ काढण्याच्या दुकानात आश्रय घेतला होता. वादळामुळे या दुकानावर ‘होर्डिंग्ज’ कोसळल्याने मृत्यू झाला, अशी माहिती रावेत पोलिसांनी दिली. स्थानिक पोलीस, प्रशासन आणि अग्नीशमनदल यांकडून ‘क्रेन’च्या साहाय्याने ‘होर्डिंग्ज’ बाजूला करण्याचे काम चालू आहे.