पुणे येथील बाजार समितीतील अधिकार्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत !
मार्केेंट यार्ड पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढून कामगारांकडून निषेध व्यक्त
पुणे – बाजार समितीतील (‘मार्केट यार्ड’मधील) बाजार आवारात अवैध व्यवसाय करणार्यांविरुद्ध कारवाई केल्याने बाजार समितीच्या अधिकार्यांच्या विरोधात नोंद केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी बाजार आवारातील अडते, कामगार, हमाल यांच्याकडून १७ एप्रिल या दिवशी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
६ मासांपूर्वी मार्केट यार्डाच्या आवारात अवैध व्यवसाय करणार्या विक्रेत्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाई केली होती. या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला होता; मात्र ६ मासांनंतर बाजार समितीच्या आवारामध्ये अवैध लिंबू विक्री करणार्या महिलेने जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंग यांची तक्रार दिली होती. त्यानुसार बाजार समितीचे अधिकारी, अडते संघटनेच्या पदाधिकार्यांसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये बाजार आवारातील अडते संघटना, व्यापारी संघटना, कामगार, हमाल, तोलणार, टेंपोचालक यांनी काळ्या फीती बांधून पोलीस कारवाईचा निषेध व्यक्त केला.