माझ्याविषयी आणि सहकारी यांच्याविषयी दाखवत असलेल्या वृत्तांमध्ये तथ्य नाही! – अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई – मी आणि माझ्या काही सहकार्यांविषयी अकारण अपसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. माझ्याविषयी आणि सहकारी यांच्याविषयी दाखवल्या जाणार्या वृत्तांमध्ये तथ्य नाही. मी आणि माझे सहकारी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी मांडली. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांचे ४० सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून सत्ताधार्यांना पाठिंबा देणार असल्याची वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. त्या संदर्भात अजित पवार यांनी पत्रकारांसमोर ही भूमिका मांडली.