मुंबईतून जप्त केलेले १ सहस्र किलो अंमली पदार्थ नष्ट !
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाची कारवाई !
मुंबई – मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाने गेल्या वर्षभरात मुंबईतून जप्त केलेले सुमारे १ सहस्र किलो अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. त्यात गांजा, चरस, मेफेड्रॉन (एम्.डी.), कोकेन, हेरॉईन, मेथॅक्युलॉन, एम्.डी.एम्.ए., एक्सटॅसी गोळ्या या अंमली पदार्थांचा समावेश आहे.
एकुण २०१ एन.डी.पी.एस. गुन्हयातील तब्बल १०१८किलो वजनाचा अंदाजे १२ कोटी रुपायांचा अंमली पदार्थांचा साठा तळोजा येथे जाळून नष्ट करण्यात आला. मा. @CPMumbaiPolice विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त श्री.देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. #MakingMumbaiSafer pic.twitter.com/3tkVkMaVAJ
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) April 18, 2023
‘मुंबई वेस्ट मॅनजमेंट लि.मि.’च्या नवी मुंबईतील तळोजा येथील प्रकल्पात याअंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किंमत सुमारे १२ कोटी रुपये असल्याचे अधिकार्याने सांगितले. नष्ट करण्यात आलेले अंमली पदार्थ २०१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाअंमली पदार्थांची होणारी तस्करी कायमचीच रोखण्यासाठी काय प्रयत्न करणार ? हे पोलिसांनी सांगावे ! |