कारागृहात असलेले नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून इफ्तार पार्टीचे निमंत्रण !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या लेटरहेडवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निमंत्रण पत्रिकेमध्ये कारागृहात असलेल्या नवाब मलिक यांचे नाव छापण्यात आले आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी केलेल्या भूमी खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक हे सध्या कारागृहात आहेत.
पवित्र रमजान निमित्त मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, मंगळवार, दि. १८ एप्रिल २०२३ रोजी इस्लाम जिमखाना, मरीन लाईन, मुंबई येथे संध्याकाळी ७… pic.twitter.com/gU1MO2GPyF
— NCP (@NCPspeaks) April 17, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ‘ट्विटर हँडल’वरून या इफ्तार पार्टीची निमंत्रणपत्रिका प्रसारित करण्यात आली आहे. मुंबईतील मरीन लाईन्स येथील इस्लाम जिमखाना येथे १८ एप्रिल या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वत: शरद पवार यांसह अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित रहाणार आहेत.