सातारा येथे आनंदाचा शिधा वाटपास प्रारंभ !
सातारा, १८ एप्रिल (वार्ता.) – येथील औद्योगिक वसाहतीमधील शिधावाटप दुकानदार पिंगळे यांच्या दुकानातील ग्राहकांना आनंदाचा शिधा वाटण्यास प्रारंभ करण्यात आला. पुरवठा विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, नायब तहसीलदार सुनील शेटे, पुरवठा निरीक्षक संतोष दळवी, सातारा रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे आणि ग्राहक उपस्थित होते.