नागपूर येथे चौकीदाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
नागपूर – लकडगंजमधील एका बहुमजली इमारतीत पत्नीसह रहाणारा चौकीदार महेश रहांगडाले (वय ५८ वर्षे) याने याच इमारतीमधील एका कुटुंबातील एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीला पाणी देण्याच्या बहाण्याने घरात नेऊन लैंगिक अत्याचार केले. तिने प्रतिकार केला असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर आई-वडिलांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंद करून महेश याला अटक केली. ही घटना ११ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता घडली. पीडित मुलगी सायकल चालवून थकल्याने महेशजवळ येऊन बसली होती. त्या वेळी ही घटना घडली.
संपादकीय भूमिकासमाजात लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने लैंगिक अत्याचार करणार्या अशा नराधमांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. |