हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने शिवजयंती उत्‍सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

कराड, १८ एप्रिल (वार्ता.) – येथील हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने शिवजयंती उत्‍सवानिमित्त १९ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. शिवप्रेमींनी आपल्‍या परिसरात शिवकालीन देखावे, भगव्‍या पताका, ध्‍वज लावण्‍याचे, तसेच २३ एप्रिल या दिवशी निघणार्‍या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीत मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहाण्‍याचे आवाहन संघटनेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. १९ एप्रिल या दिवशी प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. शरद पोंक्षे यांचे ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्‍व आणि हिंदु राष्‍ट्र’ या विषयावर कृष्‍णामाई घाट येथे सायंकाळी ७ वाजता व्‍याख्‍यान आहे. २१ एप्रिल या दिवशी संघटनेच्‍या वतीने चावडी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मूर्तीची प्रतिष्‍ठापना, २२ एप्रिलला अक्षय्‍य तृतीयेच्‍या दिवशी कराड शहर आणि तालुक्‍यातील सर्व शिवजयंती मंडळांच्‍या मूर्तींची प्रतिष्‍ठापना,
रणरागिणींची दुचाकी फेरी काढण्‍यात येणार आहे. २३ एप्रिल या दिवशी श्री पांढरीचा मारुति मंदिर या ठिकाणाहून महाराष्‍ट्रातील सर्वांत मोठी ऐतिहासिक दरबार मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. यामध्‍ये विविध चित्ररथांचा समावेश असेल.