निगडी (पुणे) पोलीस चौकीत तरुणीची गळफास घेत आत्महत्या
पिंपरी (जिल्हा पुणे) – एका प्रकरणात चौकशीसाठी कह्यात घेतलेल्या गोव्यातील २९ वर्षीय तरुणीने १७ एप्रिल या दिवशी निगडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ओटास्कीम पोलीस चौकीतील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.
निगडीतील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली होती. एक तरुणी अल्पवयीन मुलीसह असल्याचा संशय स्वयंसेवी संस्थेला आल्याने त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले; मात्र ही अल्पवयीन मुलगी निगडीतून बेपत्ता झाल्याचे समजल्यावर कोतवाली पोलिसांनी निगडी पोलिसांना कळवले. त्यानंतर दोघींना निगडी येथे आणले. या घटनेविषयी अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांचा जबाब घेणे चालू असतांना तरुणीने शौचालयातील ग्रीलला स्वेटरने गळफास घेऊन आत्महत्या केली.