अमरावती येथे तरुणीचे लैंगिक शोषण करणार्या पोलीस कर्मचार्यावर गुन्हा नोंद !
अमरावती – विवाहासाठी स्थळ म्हणून आलेल्या तरुणीवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राजेश कासदेकर (वय २७ वर्षे, रा. चंदनपूर, अकोला) याच्यावर धारणी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कासदेकर सध्या लातूर येथे कार्यरत आहे. पीडित २२ वर्षीय तरुणीच्या विवाहासाठी तिच्या भावाच्या एका मित्राच्या माध्यमातून राजेश कासदेकर याचे स्थळ आले होते. त्यामुळे त्यांची ओळख झाली. त्यानंतर राजेश याने पीडित तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्याशी मैत्री केली, तसेच अनेकदा तरुणीच्या घरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित तरुणीने त्याच्याकडे विवाहासाठी तगादा लावल्यावर त्याने त्यास नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने राजेश याच्या विरोधात धारणी ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाअशा वासनांध पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? पोलिसांच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण पोलीस दलाची अपर्कीती होत आहे. |