कर्नाल (हरियाणा) येथे ‘राईस मिल’ची इमारत कोसळून ४ कामगारांचा मृत्यू
कर्नाल (हरियाणा) – येथे ‘शिवशक्ती राईस मिल’ची इमारत कोसळून त्यात २० ते २५ कामगार गाडले गेले आहेत. आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि बचाव पथक यांनी घटनास्थळी साहाय्यता कार्य चालू केले आहे.