सुदानची राजधानी खार्टूम येथून ५० लाख नागरिकांचे पलायन !

सुदानमध्ये हिंसाचार चालूच !

सुदानमधील भारतियांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारकडून नियंत्रण कक्ष स्थापन !

नागरिकांचे पलायन

खार्टूम (सुदान) – सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे आतापर्यंत १८० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १ सहस्र ८०० लोक घायाळ झाले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे सुदानमधील परराष्ट्रमंत्री वोल्कर पेर्थस यांनी दिली. या संघर्षामुळे राजधानी खार्टूम येथील ५० लाख लोकांनी पलायन केले आहे. अनेक विदेशी नागरिक वीज आणि पाणी यांविना घरात अडकून पडले आहेत. १६ एप्रिल या दिवशी झालेल्या गोळीबारात अल्बर्ट या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता.

सुदानमधील संघर्ष अल्प होत नसल्याने तेथील भारतियांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या भारतियांसाठी केंद्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. देशात एकूण ४ सहस्र भारतीय आहेत. त्यांपैकी १ सहस्र २०० जण अनेक वर्षांपासून तेथे स्थायिक आहेत.

सुदानमधील भारतियांसाठी नियंत्रण कक्षाचा संपर्क !

टोल फ्री क्रमांक : १८००-११-८७९७
दूरभाष क्रमांक : +९१-११-२३०१२११३, +९१-११-२३०१४१०४, +९१-११-२३०१७९०५
भ्रमणभाष क्रमांक : +९१-९९६८२९१९८८
ई-मेल पत्ता : situationroom@mea.gov.in