लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावरील आक्रमणाची एन्.आय.ए. करणार चौकशी
लंडन (ब्रिटन) – येथील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांकडून काही आठवड्यांपूर्वी झालेल्या आक्रमणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) चौकशी करण्यात येणार आहे. हे प्रकरण काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाच्या आतंकवादविरोधी आणि कट्टरताविरोधी विभागाने एन्.आय.ए.कडे सोपवले होते.
सौजन्य : ANI News