पृथ्वीवरील बहुसंख्य माणसे अध्यात्म सोडून इतर विषयांचा अभ्यास करतात, हे आश्चर्य आहे !
पृथ्वीवर अभ्यासल्या जाणार्या सर्व विषयांत नवीन संशोधनामुळे पालट होतात; कारण ते सर्व विषय अपूर्ण आहेत. पालट होत असल्याने त्या विषयांचा पुनःपुन्हा अभ्यास करावा लागतो. डॉक्टरांना नवीन उपचारांच्या पद्धती, वकिलांना नवीन कायदे, संगणकवाल्यांना नवीन संगणकप्रणाली इत्यादींचा अभ्यास करावा लागतो. तसेच त्या विषयांमुळे चिरंतन आनंद मिळत नाही.
याउलट अध्यात्म हे परिपूर्ण शास्त्र असल्यामुळे त्यात नवीन संशोधन होऊ शकत नाही. त्यामुळे परत परत अभ्यास करावा लागत नाही. तसेच अध्यात्म विषयाच्या अभ्यासामुळे चिरंतन आनंद मिळतो. असे असूनही पृथ्वीवरील बहुसंख्य माणसे अध्यात्म सोडून इतर विषयांचा अभ्यास करतात, हे आश्चर्य आहे !
– परात्पर गुरु डॉ. आठवले