मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुढे ढकलला !
ठाणे – कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्र ग्रंथाचा १८ मार्च या दिवशी होणारा प्रकाशन सोहळा रहित करण्यात आला आहे. निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी शब्दबद्ध केला आहे.
नजिकच्या काळात निश्चितच हा प्रकाशन समारंभ आपण घेणार आहोत, असे कार्यक्रमाचे निमंत्रक, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांनी सांगितले.