शंभुदुर्ग प्रतिष्ठानच्या चेतावणीनंतर ख्रिस्ती व्यक्तीकडून पदाचे त्यागपत्र !
ऐतिहासिक वज्रेश्वरी देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारीपदी ख्रिस्ती व्यक्तीच्या नियुक्तीचे प्रकरण
ठाणे – हिंदूंच्या प्राचीन परंपरेचा वारसा असलेल्या भिवंडी येथील वज्रेश्वरी या ऐतिहासिक मंदिराच्या जनसंपर्क अधिकारीपदी फ्रान्सिस जोसेफ लेमॉस या ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला होता. याविषयी शंभुदुर्ग प्रतिष्ठानकडून आंदोलनाची चेतावणी देण्यात आली होती. हिंदुत्वनिष्ठांमध्ये उमटलेल्या तीव्र पडसादामुळे देवस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता पाटकर यांनी फ्रान्सिस यांना पदावरून हटवण्याचे सुतोवाच केले होते; मात्र त्यापूर्वीच फ्रान्सिस यांनी स्वत:हून पदाचे त्यागपत्र दिले आहे.
१. शंभुदुर्ग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी १६ एप्रिल या दिवशी वज्रेश्वरी मंदिरामध्ये जाऊन फ्रान्सिस यांची नियुक्ती रहित करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर फ्रान्सिस यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र देवस्थानच्या अध्यक्षांकडे सुपुर्द केले.
२. फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांच्या या भूमिकेचे शंभुदुर्ग प्रतिष्ठानकडून स्वागत करण्यात आले आहे.
३. ठाणे जिल्ह्यात ख्रिस्ती मिशनर्यांनी आदिवासी वस्त्यांवर प्रार्थनास्थळे उभारून लोकांशी संपर्क वाढवला आहे. त्यांच्या संपर्कात येणारे हिंदू बांधव कालांतराने हिंदु धर्माला मानत नाहीत, तर काही लोक हिंदु धर्माचा त्यागही करत असल्याचे आढळून आले आहे.
४. ‘ख्रिस्ती मिशनर्यांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रयत्नरत आहेत. असे असतांना वज्रेश्वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची निवड करणे, हे हिंदु धर्मावर आणखी संकटे ओढवणारे आहे’, अशी भूमिका शंभुदुर्ग प्रतिष्ठानने वज्रेश्वरी देवस्थानला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली होती.
५. ‘हिंदु राष्ट्र सेने’च्या कार्यकर्त्यांनीही या प्रकरणी आंदोलन करण्याची चेतावणी दिली होती. यानंतर पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. फ्रान्सिस जोसेफ लेमॉस यांच्या त्यागपत्रामुळे या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.
संपादकीय भूमिका
|