आक्षेपार्ह लिखाणाप्रकरणी हिंगोली पोलिसांकडून १४८ जणांना नोटिसा !

हिंगोली – हिंगोली पोलिसांकडून सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण केल्याविषयी १४८ जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्यात ४ जणांना यावरून कारागृहात जावे लागले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या दंगलीनंतर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली सायबर पोलिसांकडून सामाजिक माध्यमांवर २४ घंटे पाळत ठेवण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

भडक, जातीय तेढ निर्माण करणार्‍या, शांतता भंग करणार्‍या ‘पोस्ट’वर लक्ष ठेवण्यात येत आहे. आक्षेपार्ह छायाचित्र किंवा व्हिडिओ पुढे पाठवणे, ते प्रसारित करणे, आवडल्याचे सांगणे यांवर त्वरित माहिती काढून संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येत आहे.